लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोनाच्या लढ्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलात समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न धुळे जिल्हा पोलिस दलाने सुरू केले आहेत़ धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, होमगार्ड, पोलिस मित्र, एनसीसी कॅडेटस् यांना विशेष पोलिसाचा दर्जा देण्यात आला आहे़ विनाकारण होणाऱ्या गर्दीवर आता हे विशेष पोलिस नियंत्रण ठेवण्यास मदत करणार आहेत़ पोसिल मित्रच्या धर्तीवर ८० पेक्षा अधिक नागरीकांना विशेष पोसिल अधिकाºयाचा दर्जा देण्यात आला आहे़शनिवारी सकाळी या सर्वांची बैठक घेवून त्यांना विशेष पोलिस म्हणून दर्जा दिला़ जिल्हा पोसिल अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी काम आणि जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले़ तसेच या विशेष पोलिसांना मोठ्या अक्षरात पोलिस लिहीलेले टी शर्ट आणि आय कार्डचे वाटप करण्यात आले़ पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत हा कार्यक्रम पार पडला़ यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ़ राजु भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, रवींद्र सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत आदी उपस्थित होते़कोरोनावर मात करण्यासाठी धुळे जिल्हा पोलिस दलाने विविध समाजघटकांचे सहकार्य घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे़ पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी गेल्या आठवड्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्रकार परिषदेत याबाबतचे सुतोवाच केले होते़ त्यानुसार त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली आहे़ मुंबई पोलिस कायद्यानुसार हे विशेष पोलिस अधिकारी नेमले असल्याची माहिती पोलिसांनी दिली़पोलिसांनी विविध समाजघटकांचा सहभाग वाढवून घेतल्याने कोरोना संसर्गाच्या काळात गर्दीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाणार आहे़
धुळे पोलिसांना आता ‘विशेष पोलिस’ देणार साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 9:31 PM