शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

धुळे मतदार संघात ५७ टक्के मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:07 PM

ईव्हीएमचा बिघाड, मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ कायम 

ठळक मुद्देसकाळी व संध्याकाळी मतदारांच्या रांगा दुपारी उन्हामुळे केंद्रांवर शुकशुकाट ईव्हीएममध्ये बिघाडाच्या तक्रारी, काही काळ खोळंबा, मतदारयादीतही गोंधळ

लोकमत आॅनलाईन धुळे  : लोकसभा निवडणुकीसाठी २८ रोजी झालेल्या मतदानादरम्यान धुळे मतदार संघात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ५७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.  मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर उत्साह दिसून येत होता. जिल्ह्यात काही ठिकाणी रांगा लागल्या तर काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात मतदार आपला हक्क बजावत होते. त्यानुसार पहिल्या दोन तासात सकाळी ९ वाजेपर्यंत धुळे लोकसभा मतदार संघात ५.६७ टक्के  मतदान झाले. त्यांनतर ११ वाजेपर्यंत २९.७५ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ४०.५१ टक्के तर  ४ ते ५ वाजे दरम्यान ५०.०८ टक्के मतदान झाले होते़वाढत्या तापमानामुळे सकाळी मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसत होता़ मात्र सायंकाळी ४ वाजेनंतर मतदान केद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होते़ त्यामुळे सायंकाळपर्यत ५७ टक्के मतदान होते़ मतदान केद्रांवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील काही मतदान केंद्रावर प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनाद करण्यात आला होता़२८ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’!धुळे मतदार संघासाठी ३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी व माघारीनंतर २८ उमेदवार रिंगणात राहिले.  डॉ़ सुभाष भामरे (भाजप), कुणाल पाटील (कॉँग्रेस), संजय अपरांती  (बहुजन समाज पार्टी ) कुणाल पाटील ( कॉँग्रेस)  सुभाष रामराव भामरे (भाजपा) अनिल गोटे (लोकसंग्राम) अनिल जाधव (बळीराजा पार्टी ) मोहम्मद अन्सारी (मायनॉरिटीज सुरक्षा महासंघ) ताहेर सत्तार खाटीक (राष्टÑीय मराठा पार्टी)  दिलीप पाटील (बहुजन मुक्ती पार्टी ) नबी अहमद अहमद दुल्ला (वंचित बहुजन आघाडी) नंदकुमार चव्हाण (राष्टÑीय जनसेना पार्टी ) पंढरीनाथ मोरे (भारतीय ट्रायबल पार्टी ) जैनुद्दीन पिंजारी (बहुजन महापार्टी ) हिना मेवाती (भारतीय पार्टी ) सीताराम वाघ (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) इरफान मो.इसहाक (अपक्ष) एकबाल  मो.रफिक (अपक्ष)कास्मी कमाल (अपक्ष) धीरज चोरडिया (अपक्ष) अय्युबखान तडवी (अपक्ष ) दिनेश कोळी (अपक्ष) नसिम रऊफ बाबा खान (अपक्ष) नितीन खरे अपक्ष, सलीम  पिंजारी (अपक्ष) सुभाष वसंत भामरे (अपक्ष) मेराज बी हुसेन खान (अपक्ष) मोहम्मद रिजवान (अपक्ष) ज्ञानेश्वर ढेकळे (अपक्ष) यांचे भाग्य सीलबंद झाले. दरम्यान, २३ मे  रोजी धुळे येथील नगावबारी परिसरात मतमोजणी होेणार आहे. त्यामुळे मतदारांना आता धुळ्याचा खासदार नेमका कोण होणार याकडे लक्ष लागुन आहे़ कापडणे केंद्रात साडेसहापर्यत मतदान कापडणे येथे सायंकाळपर्यत मतदान प्रक्रिया सायंकाळी साडेसहा वाजेपर्यत सुरू होते़ त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यत मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा दिसून आल्या़ त्यामुळे ६१.१७ टक्के मतदान झाले आहे.बभळाज येथे सव्वा सातपर्यत मतदान बभळाज येथे आदिवासी समाजात लग्न व मजूर शेतात गेल्यामुळे रात्री सव्वा सात वाजेपर्यत मतदान सुरू होते़ त्यामुळे ६८.३६ टक्के मतदान झाले होते़

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक