- मिलिंद कुलकर्णी धुळे/जळगाव : धुळ्यात मिळालेला विजय हा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आत्मविश्वास दुणावणारा आहे. धुळ्याच्या निकालाचे भाजपाच्यादृष्टीने आणखी वैशिष्ट्य असे की, धुळ्यात उत्तमराव पाटील, धरमचंद चोरडीया, लखन भतवाल यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांची परंपरा असली तरी धुळ्यात भाजपा रुजला असे झाले नाही.शिवसेना-भाजपा युतीच्या काळात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने भाजपाकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ उरले नव्हते. २०१४ च्या मोदी लाटेत डॉ. सुभाष भामरे हे शिवसेनेतून तर अनिल गोटे हे लोकसंग्राममधून भाजपामध्ये आले आणि अनुक्रमे खासदार आणि आमदार बनले. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गोटे जिंकले. दोघे भाजपामध्ये एकाचवेळी आल्यानंतर भामरे केंद्रीय मंत्री झाले, हे गोटे यांचे दुखणे आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे त्यांचे दुसरे प्रतिस्पर्धी उमेदवार. सलग १५ वर्षे महापालिका ताब्यात ठेवणाºया कदमबांडे यांना विधानसभा निवडणुकीत मात्र गोटेंकडून सलगतेने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीला पुढील वर्षीच्या दोन्ही निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. रंगीत तालमीत जो बाजी मारेल, त्याचा दावा बळकट राहणार होता. म्हणून गोटे यांनी तीन महिन्यांपासून तयारी सुरू केली होती.सर्वच पक्षांची वाताहतलोकसंग्राम : आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला दारुण पराभवास सामोरे जावे लागले. त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांचा विजय सोडला, तर आमदारांचे चिरंजीव तेजस यांच्यासह सर्वच उमेदवार पराभूत झाले.राष्टÑवादी : काँग्रेस आघाडी : राष्टÑवादी - काँग्रेस यांचा एक वॉर्ड एक चिन्ह हा फॉर्म्युला देखील अपयशी ठरला. प्रथमच दोन्ही पक्षाचे नेते हे एकदिलाने प्रचार करीत असल्याचे दिसले. काँग्रेसला तर गेल्या वेळेपेक्षाही एक जागा कमी मिळाली तर सत्ताधारी राष्टÑवादीला यंदा दोन आकडी संख्याही पार करता आली नाही.शिवसेनेला हादरा : शिवसेनेला निवडणुकीत जबर हादरा बसला आहे. सेनेच्या विद्यमान दोन महानगरप्रमुखांसह आजी- माजी पदाधिकारी पराभूत झाले.एमआयएमचा प्रवेश : महापालिकेत प्रथमच एमआयएमचे चार उमेदवार निवडून आले आहेत. तीन उमेदवार देवपुरातील एकाच प्रभागातून निवडून आले.गोटे व एकनाथ खडसे यांचे ‘गुरुबंधू’चे असलेले नाते हा एक पदरदेखील महाजनांच्या नियुक्तीमागे होता.पक्षीय बलाबलपक्ष २०१८ २०१३भाजपा ५0 0३काँग्रेस 0६ 0७राष्ट्रवादी 0८ ३४शिवसेना 0१ ११लोकसंग्राम ०१ 0१सपा 0२ 0३बसपा ०१ ०१एमआयएम ०४ 00अपक्ष ०१ १0
धुळ्यातील निकाल भाजपाचा आत्मविश्वास दुणावणारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:05 AM