धुळे, दि.3- जिल्हा रुग्णालयाच्या जागी नव्याने सुरु होणा:या सवरेपचार रुग्णालयाचे घोडे बांधकाम परिक्षणाअभावी (स्ट्रर ऑडीट) अडलेलेच आह़े रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात येऊनही केवळ बांधकाम विभागाच्या उदासीन धोरणामुळे हे काम अद्यापही रखडले असल्याचे स्पष्ट आह़े बांधकाम परिक्षणासाठी आता मुहुर्त शोधला जातो की काय? असा मुद्दा चर्चेत आलेला आह़े कामातील तत्परता तातडीने दाखविल्यास जुने जिल्हा रुग्णालयात नव्याने सवरेपचार रुग्णालय सुरु होवून त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळू शकतो़
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील धुळे शहरालगत असलेल्या चक्करबर्डी परिसरात हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील नूतन इमारतीत जिल्हा रुग्णालयाचा कारभार मार्च 2016 पासून सुरू करण्यात आला होता़ तत्पूर्वी ही इमारत बांधून तयार असूनही केवळ विनियोग होत नसल्यामुळे इमारतीची दुरवस्था होत होती़ लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे त्याचा वापर होऊ लागला़ आज या इमारतीत जिल्हा रुग्णालयाचे काम सुरू आह़े
हे रुग्णालय स्थलांतरित केल्यानंतर जुन्या जिल्हा रुग्णालयात 200 खाटांच्या रुग्णालयासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू झाला होता़ याकामी माजी आमदार प्रा़ शरद पाटील, जवाहर पाटील यांनी पुढाकार घेतला़ या अनुषंगाने 200 खाटांचा प्रस्ताव नाशिक आरोग्य उपसंचालकांमार्फत आरोग्य संचालक आणि मंत्रालय पातळीवर 1 जून 2009 रोजी सादर झालेला आह़े
2 जानेवारी 2017 मध्ये 307 पदांना मंजुरी मिळाली आह़े इमारतीचा वापर करण्यासंदर्भात बांधकाम परीक्षणासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ संजय शिंदे यांनी स्पष्ट केल़े शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परीक्षण केले जाईल़ नंतर त्याचा वापर होईल, असेही ते म्हणाले होत़े त्यानंतर 25 मार्च 2017 रोजी रुग्णालय प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम परिक्षणाबाबत पत्र देण्यात आलेले आह़े त्यामुळे आता कधी परिक्षण करण्यासाठी कधी मुहुर्त लागणार याची प्रतिक्षा आह़े