ऑनलाईन लोकमत
धुळे ,दि.9 : जिल्ह्यात साक्री तालुक्याचा अपवाद वगळता सलग दुस:या दिवशी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. गुरुवारी सायंकाळी शिरपूर भागातही दमदार पावसाने हजेरी लावली होती़
धुळे परिसरात धुवाधार पाऊस
गुरुवारी संध्याकाळी धुळे शहर व परिसरात पावणेसात वाजेच्या सुमारास मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अर्धा ते पाऊणतास मुसळधार पाऊस झाला. यामुळे सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. शिंदखेडा तालुक्यात 6 वाजेच्या सुमारास अर्धा तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. शिरपूर येथे संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाचे वातावरण तयार झाले होते.
चा:यासह कांद्याचे नुकसान
बुधवारी झालेल्या पावसामुळे शेतामधील गुरांचा चारा, कांदा यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी कांदा सडण्याच्या मार्गावर आहे.
नरडाणा परिसरात पाऊस
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद ते नरडाणा दरम्यान गुरुवारी सायंकाळी वादळी पाऊस झाल्याने नाल्यांना पूर आला़ त्यामुळे राज्य मार्गावरील वाहतूक थांबली होती़ वादळामुळे काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली होती़ रस्त्याच्या दोन्ही बाजूला 70 ते 75 वाहने आणि 4 परिवहन महामंडळाच्या बसेस अडकून पडल्या़ न्
शिंदखेडा तालुक्यातील वर्शी परिसरातही गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली़ परिसरात पाऊस सुरु झाल्याने बळीराजा आनंदीत झालेला आह़े शिरपूर शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पाऊस सुरु झाला़ अचानक आलेल्या पावसामुळे सर्वाचीच धांदल उडाली़