धुळे : हिंदू देवी-देवतांच्या बदनामीसह गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी मालेगावरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात येऊन कडकडीत बंदही पाळण्यात आला. आग्रारोडवरील श्रीराम मंदिरात आरती करण्यात येऊन मोर्चाची सांगता झालीदेवतांची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच यापूर्वी गोरक्षकावर हल्ला करण्यात आला होता. या सर्व घटनांमुळे तरुण वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिसांकडून विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर दबाव टाकणे, गुन्हे दाखल करणे आदी प्रकार करून दडपशाही केली जात आहे. रविवारी झालेल्या बैठकीत शहर बंदची हाक देण्यात आली होती़ आवाहनानंतर सोमवारी सकाळी १० वाजता मनोहर टॉकीजसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शांततेत मोर्चा काढण्यात आला़ पाचकंदिल येथे सामूहिक हनुमान चालिसा पठण झाले़ त्यानंतर आग्रारोडवरील श्रीराम मंदिरात सामूहिक आरती झाल्यानंतर मोर्चाचा शांततेत समारोप झाला़शहरातील आग्रारोड, मुख्य बाजार पेठ, पाच कंदील, देवपुरातील व्यापाऱ्यांनी दुकाने, व्यवसाय बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला होता़
धुळे बंदला प्रतिसाद, उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:30 PM