- देवेंद्र पाठक धुळे - भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन कार आणि दुचाकी यांच्यात अपघात तिहेरी अपघात झाला. यात वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. ही घटना साक्री तालुक्यातील निजामपूर ते वाजदरे दरम्यान मंगळवारी सकाळी सकाळी घडली. तरुणाच्या फिर्यादीवरुन दुपारी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
एमएच १५ एफएन १९९० क्रमांकाची कारमधून गाडी मालक अशोक भिवसन पानपाटील यांची पत्नी निर्मला अशोक पानपाटील यांना नंदुरबार येथे दवाखान्यात घेऊन जात असताना साक्री तालुक्यातील निजामपूर ते वाजदरे रोड दरम्यान लगडी भवानी मंदिराजवळ एमएच १५ एचवाय ९११९ क्रमांकाच्या कारची जोरदार धडक बसली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारच्या पुढे जात असलेली एमएच १८ बीके ६०२४ क्रमांकाच्या दुचाकीवर जावून कार आदळली. या तिहेरी अपघातात तिनही वाहनांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. अपघाताची ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी समीर शादीक शाह (वय २३, रा. खुडाणे रोड, जैताणे, ता. साक्री) यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.