राजेंद्र शर्माधुळे- नगाव (ता.धुळे) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी व शेतमजूर विकास पॅनलचा विजय झाला. त्यामुळे महाविकास आघाडीने नगाव सेवा सोसायटीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. या निवडणुकीत भाजपाचे माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. विजयी पॅनलमधील पदाधिकार्यांचा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीच्या पॅनलने नगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीत पहिल्यांदा आपली सत्ता स्थापन केली. नगाव सेवा सोसायटीवर भाजपाचे मनोहर भदाणे यांची गेल्या अनेक वर्षापासून सत्ता होती. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीचे शेतकरी व शेतमजूर विकास पॅनलने विजय मिळवित भाजपचे माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे व जि.प.सदस्य राम भदाणे यांच्या पॅनलचा पराभव केला.
या निवडणुकीत प्रशांत गुलाबराव भदाणे, रावण एलजी पाटील, रविंद्र श्रीधर पाटील, नवसाबाई रंगराव पाटील, उषाबाई गुलाबराव पाटील, निर्मलाबाई अशोक बैसाणे हे विजयी झाले. या नवनिर्वाचित संचालकांचा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते मंगळवारी जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी आर.पी.पाटील,भाईदास पाटील, अॅड.राहूल पाटील, मुंकूंद पाटील, भटू पाटील, जगदिश पाटील, शिवदास पाटील,भगवान पवार, भगवान पाटील, अरुण पाटील, भटू राजधर पाटील, संजय पाटील, जगन्नाथ बैसाणे, प्रविण थोरात, किशोर पाटील, संजय भदाणे, योगेश पाटील,सुरेश पवार, प्रविण पाटील, नंदलाल भामरे,एस.एन.पाटील, महेश भदाणे उपस्थित होते.