आॅनलाइन लोकमतशिंदखेडा/साक्री : कॉँग्रेसने आतापर्यंत आपल्या नातेवाईकांना उमेदवारी दिली होती .मात्र यापुढे पक्षाच्या कार्यकर्त्यांची गुणवत्ता बघूनच उमेदवारी देण्यात येईल. आता कॉँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली एकजूट कायम ठेवून धुळे जिल्हा परिषदेवर महाआघाडीचा झेंडा फडकवा असे आवाहन कॉँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी आमदार कल्याण काळे यांनी केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कॉँग्रेसतर्फे बुधवारी सकाळी शिंदखेडा व दुपारी साक्री येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.शिंदखेडायेथील बिजासनी मंगल कार्यालयात कॉँग्रेसतर्फे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप साळुंखे, इंटक जिल्हा अध्यक्ष प्रमोद सिसोदे, पांडुरंग माळी, डॉ.दरबार गिरासे, माजी नगराध्यक्ष दीपक देसले, किशोर पाटील, रावसाहेब पवार, नगरसेवक तथा नगरपंचायत विरोधीपक्ष नेता सुनील चौधरी, दीपक अहिरे, प्रकाश पाटील, सुभाष देसले, आदी होते.कल्याण काळे यांनी सांगितले शिंदखेडा तालुक्यात राजकीय वातावरणात बदल होत असून परिवर्तन निश्चित होणार आहे. कारण कार्यकर्त्यांचा उत्साह उपस्थिती पाहता हे शक्य होणार आहे.शोभा बच्छाव म्हणाल्या की तालुक्याचे संघटन उत्कृष्ट असून याचा फायदा आगामी निवडणुकीत निश्चित होईल. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनीही मनोगत व्यक्त केले.मेळाव्यात इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचीही मते जाणून घेण्यात आली. मेळाव्याला तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, किशोर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पाटील, आबा मुंडे पाटील, महेंद्र पाटील, शामकांत पाटील, नगरसेवक दीपक आहिरे, राजेंद्र देवरे, डॉ जयवंत बोरसे, डॉ. प्रशांत बागुल, महेंद्र निकम, माधव बडगुजर, भटू पाटील, पंकज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी पाटील, गणेश नेतले, पंढरीनाथ सिसोदे, यांसह तालुक्यातील कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे जिल्हा परिषदेसाठी गुणवत्ता बघून कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 2:35 PM