आॅनलाइन लोकमतधुळे : वीज चोरीला आळा घालण्यासाठी तसेच मीटर रिडींग अचूक कळावे यासाठी येत्या काही दिवसात जिल्हयातील घरगुती, व व्यावसायिकांचे ४ लाख २२ हजार ६०९ वीज मीटर बदलविण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रकाश पौनिकर यांनी दिली.महावितरण कंपनीतर्फेही पेपरलेस व्यवहाराला प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून आॅनलाईन बिल भरण्यावर भर दिला जात आहे. परंतु मीटरचा फोटो काढून नेल्यावर त्याचा मेसेज कधीतरी येतो. ग्राहकाकडून तो मेसेज डिलीट होतो. त्यामुळे आपल्याला किती रिडींगचे बिल आले आहे, हे ग्राहकाला समजत नाही. काहीवेळा तर एकदम दोन महिन्यांचेच बिल ग्राहकांना दिले जाते. त्यामुळे बिलाचा आकडा बघूनही ग्राहकांना ‘शॉक’ बसत असतो. तसेच वीज चोरीचेही प्रमाण अनेक ठिकाणी असते. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी सर्वच मीटर बदलविण्याचा निर्णय महावितरणने घेतलेला आहे. यात पहिल्या टप्यात घरगूती व व्यावसायिकांचे मीटर बदलविण्यात येणार आहे.या नवीन मीटरचा ठेका जेनस कंपनीला देण्यात आलेला आहे. महावितरणतर्फे सर्वच मीटर बदलविण्यात येणार असले तरी त्यासाठी ग्राहकाला कुठलाही भुर्दंड बसणार नाही. सध्या कार्यरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मीटरची जागा लवकरच डिजीटल मीटर घेणार आहेत. या मीटरमध्ये एक विशिष्ट सॉफ्टवेअर असल्याने, ग्राहकांना मेसेज, बिल याची योग्यप्रकारे सेवा दिली जाणार आहे. जिल्ह्यात महावितरणचे एकूण ४ लाख २२ हजार ६०९ ग्राहक आहेत.
धुळे जिल्हयातील ४ लाख २२ हजार वीज मीटर बदलवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:48 AM
पहिल्या टप्प्यात घरगुती, व्यावसायिकांना नवीन मीटर देणार
ठळक मुद्देवीज चोरीला बसणार आळानवीन मीटरमध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर