Dhule: युवक काँग्रेस विधानभवनाला २१ रोजी घेराव घालणार, धुळ्यात युवा संवाद मेळाव्याला प्रतिसाद
By अतुल जोशी | Published: March 16, 2023 05:24 PM2023-03-16T17:24:03+5:302023-03-16T17:24:20+5:30
Congress: अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी २१ मार्च रोजी महाराष्ट्रातील युवक विधान भवनाला घेराव घालणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिली.
- अतुल जोशी
धुळे - अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. युवकांना सरकारी नोकऱ्या नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. पेट्रोल,डिझेल,गॅसची दिवसेदिवस भाववाढ होत आहे.राज्यात सरकारी यंत्रणांचा गैरवापर करुन व्देषाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी २१ मार्च रोजी महाराष्ट्रातील युवक विधान भवनाला घेराव घालणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिली.
धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने बुधवार दि. १५ रोजी काँग्रेस भवन धुळे येथे सायंकाळी ५ वा. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित युवकांसमोर बोलतांना कुणाल राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझे गाव माझी शाखा चळवळ राबवावी. देश हुकूशाहीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे देशातील लोकशाही वाचविण्याठी युवकांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली संघटीत व्हावे.महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे काम सुरु आहे.राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.राज्यात आणि देशात व्देषाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे येत्या २१ मार्च रोजी विधानभवनाला महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते घेराव घालणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगितले.