शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

धुळे : ६२ वर्षीय घरमालकाचा खून करणाऱ्या तरुणास जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 7:00 PM

न्यायालयाचा निकाल; दहा हजार रुपयांचा दंड

राजेंद्र शर्माधुळे : घरमालक असलेले सेवानिवृत्त बँक कर्मचारी रमेश हिलाल श्रीराव (वय ६२) यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याप्रकरणी धुळे न्यायालयाने आरोपी अजिंक्य शिवनाथ मेमाणे (वय २३, रा. धुळे) याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल सत्र न्यायमूर्ती एस. सी. पठारे यांनी दिला.

चितोड रोडवरील राजहंस कॉलनीत स्टेट बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश हिलाल श्रीराव हे पत्नी प्रमिला श्रीराव यांच्यासोबत राहत होते. यांच्या घरात शिवनाथ मेमाणे हे भाडेकरू म्हणून राहत होते. रमेश श्रीराव हे दररोज फिरायला जायचे. त्यांच्यासोबत भाडेकरू शिवनाथ मेमाणे, अजिंक्य मेमाणेही असायचा. फिरून आल्यावर दोघेही घराच्या गच्चीवर व्यायाम करायचे. २२ जून २०२१ रोजी फिरून आल्यावर रमेश श्रीराव व अजिंक्य हे गच्चीवर योगा करायला गेले. अजिंक्यने रमेश यांच्या डोक्यावर लोखंडी पाइपाने मारून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने खाली येत प्रमिला श्रीराव यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला.

काटा चमच्याने गळा चिरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड केल्याने त्या बचावल्या. याप्रकरणी धुळे शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा तपास एपीआय दादासाहेब पाटील यांनी केला. फिर्यादी पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. या खून खटल्यात मयताची पत्नी प्रमिला श्रीराव, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, एलसीबीचे छायाचित्रकार, यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी युक्तिवाद केला.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी