धुळे: वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाल्याने यात मालेगाव येथील एकता हॉटेलचा दर्शनी भाग अचानक कोसळला. यात धुळ्यात तरुण सापडल्याने गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली.मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावहून धुळ्याकडे येताना हॉटेल एकता आहे. दुपारी अडीच वाजता मुसळधार पावसासह प्रचंड वादळाला सुरुवात झाली. या वादळात हॉटेल एकताचा दर्शनी भाग अचानक कोसळला. त्यात धुळे येथील मौलवीगंज भागात राहणारा मोहम्मद सलमान मोहम्मद रफीक (३५) हा तरुण चहा घेण्यासाठी थांबलेला असताना त्या स्लॅबखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.कोसळलेल्या या स्लॅबखाली अनेक जण दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु दुपारची वेळ असल्यामुळे हॉटेलात एवढी गर्दी नव्हती. मात्र अचानक आवाज येऊ लागल्याने दर्शनी भाग कोसळत असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांसह मालक आतील भागात पळून गेले. परिणामी त्यांचे प्राण वाचले आहे. मात्र यात धुळ्याचा तरुण सापडल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
मालेगाव येथील दुर्घटनेत धुळ्याचा तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:14 PM
वादळी वाऱ्यामुळे कोसळला होता हॉटेलचा दर्शनी भाग.
ठळक मुद्देवादळी वाऱ्यामुळे कोसळला होता हॉटेलचा दर्शनी भाग.