आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गटातून ५३१ तर गणांमधून ८३१ असे एकूण १३६२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या दाखल अर्जांची मंगळवारी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली. यात जिल्ह्यातील गटामधून २१ तर गणांमधून ३० असे एकूण ५१ उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. आता गटासाठी ५१० तर गणांमधून ८०१ असे एकूण १३११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता अर्ज माघारीकडे लक्ष लागले असून, त्यानंतरच निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतील हे चित्र स्पष्ट होणार आहे.धुळे जिल्हा परिषदेची मुदत डिसेंबर २०१८ मध्येच संपली होती. मात्र जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असणाऱ्या चारही तालुक्याच्या पंचायत समितीच्या आरक्षणाचा वाद न्यायालयात पोहचल्याने, तब्बल एक वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०१९ रोजी जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असणाºया धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा परिषदेचे ५६ व पंचायत समितीचे ११२ गणांसाठी ही निवडणूक होत आहे.१८ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. शेवटच्या दिवसाअखेर ५६ गटांसाठी ५३१ तर ११२ गणांसाठी ८३१ असे एकूण १३६२ अर्ज दाखल झाले होते. यापैकी धुळे तालुक्यातून गटाचे चार, गणाचे सहा, शिंदखेडा तालुक्यातून गटातून सात व गणात नऊ, साक्री तालुक्यात गटात दोन व गणात सहा, व शिरपूर तालुक्यातून गटात आठ व गणात नऊ असे एकूण ५१ अर्ज बाद ठरले आहेत.
धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५१ उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:31 AM