आॅनलाइन लोकमतधुळे :पंचायत समिती सभापतीची निवड पुढील आठवड्यात १६ रोजी तर जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड १७ रोजी होईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.जिल्हा परिषदेसाठी नुकतीच निवडणूक होऊन मतमोजणीही झालेली आहे. या निवडणुकीत ५६ पैकी सर्वाधिक ३९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण आहे. पुढील आठवड्यात १७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड होईल असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे अनेकजण दावेदार असून, कोणाला संधी मिळते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.दरम्यान जिल्हा परिषदेप्रमाणेच धुळे, शिरपूर, शिंदखेडा या तीनही पंचायत समितीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर साक्रीत सर्वाधिक जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. मात्र याठिकाणी अपक्षांनी पाच जागा जिंकलेल्या असून, सत्तेच्या चाव्या या अपक्षांच्या हातीच आहेत. त्यामुळे येथे कोणाची सत्ता स्थापन होणार याची उत्सुकता लागून आहे.जिल्ह्यातील चारही पंचायत समितींच्या सभापतींची निवड १६ जानेवारीला होऊ शकते अशी माहितीही सुत्रांनी दिलेली आहे.
धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची १७ रोजी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:03 PM