शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

धुळे जि.प. निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:17 PM

राज्यात सरकार स्थापन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला

आॅनलाइन लोकमतधुळे :राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने, शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसलेली आहे. निवडणुकीच्या नियोजनासाठी शिवसेनेने बैठकांवर भर दिला आहे.विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल २६ दिवसानंतर धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्याच्या पंचायत समितींच्या निवडणूका जाहीर झाल्या. मात्र तोपर्यंत राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नव्हता. त्यामुळे शिवसेनेसह सर्वच पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शांतता होती. मात्र २८ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेचा विशेष म्हणजे पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाल्याने, सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितींवर भगवा फडकविण्यासाठी शिवेसेनेने कंबर कसलेली आहे. या निवडणुकांच्या नियोजनासाठी तालुकास्तरीय बैठकांचे नियोजन करण्यात येत असून, त्यात रणनिती ठरविण्यात येत आहे. सध्या तरी शिवसेनेने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत आघाडी घेतलेली दिसून येते. दरम्यान २०१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला अवघ्या दोन जागांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र आता शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालेले असून, पक्षाकडूनही अपेक्षा वाढलेल्या आहेत. यावेळी शिवसेना किती जागांवर विजय मिळविणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.भाजपशी टक्करराज्यात ज्याप्रमाणे शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तसाच प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थेत केला जाईल असे राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात तीनही पक्ष एकत्रितपणे लढणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सर्वच पक्ष आपापल्यापरीने तयारीला लागले आहेत. मात्र या सर्वच पक्षांचा सामना भाजपशीच असणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अत्यंत चुरशीच्या होतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. यात कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे