लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : शहरातील साक्री रोडच्या रूंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे़ सदर रस्त्याचे संपूर्ण काम वेगाने व्हावे यासाठी दोन स्वतंत्र ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे़ या कामामुळे साक्रीरोड परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे़शहरातील साक्रीरोड हा अत्यंत वर्दळीचा आहे़ त्यामुळे या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम वेगाने होणे आवश्यक आहे़ शिवाय संबंधित रस्त्यासाठी निधी देखील दोन टप्प्यात मंजूर झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन स्वतंत्र निविदा काढून ठेकेदारांना कार्यादेश दिले आहेत़ मोतीनाला ते सुरेंद्र डेअरीपर्यंत असलेल्या या रस्त्यासाठी १ कोटी २९ लाख ८४ हजार ७४५ व २ कोटी ३ लाख २६ हजार ८७ रूपयांच्या कामांच्या दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या होत्या़ त्यानुसार दोन ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत़
धुळ्यातील साक्रीरोडच्या सौंदर्यात पडणार भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:41 PM
बांधकाम विभाग : ३ कोटींच्या कामासाठी दोन ठेकेदारांची नियुक्ती
ठळक मुद्देदरम्यान, साक्रीरोडवरील अतिक्रमण हटविण्यात आले असून त्यानंतर रस्त्याचे काम दोन्ही बाजूने ठेकेदारांनी सुरू केले आहे़या कामात रस्त्याच्या डांबरीकरणासह दुभाजक, पादचारी मार्गाचा समावेश असणार आहे़ त्याचप्रमाणे महावितरणकडूनही रस्त्यातील विद्युत डीपी, धोकादायक तारा हटविण्यात येणार आहेत़ त्यामुळे साक्रीरोडच्या सौंदर्यात भर पडणार आहे़