ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.18- शहरातील प्रमोद नगरातील कुणाल बियरबार अखेर मंगळवारी पहाटे जमिनदोस्त करण्यात आला़ त्यामुळे तब्बल 38 दिवसांपासून पुकारलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला यश आले आहे. संबंधित बियरबारप्रश्नी मंगळवारी मंत्रालयात बैठक होणार आह़े
शहरातील नकाणे रोडवर असलेल्या प्रमोद नगरात कुणाल बियरबार होता़ परंतु सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतचे बियरबार बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रिन्स बियरबारचे स्थलांतर प्रमोद नगरात करण्यात येणार होत़े त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नगरसेवक कमलेश देवरे, नगरसेविका वैभवी दुसाणे व नगरसेविका प्रतिभा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कुणाल व प्रिन्स बियरबारच्या विरोधात लढा उभारला होता़ 38 दिवसांपासून दररोज रात्री कुणाल बियरबारसमोर नगरसेवक व नागरिक भजन आंदोलन करीत होते. तर जिल्हा प्रशासनाकडेही पाठपुरावा सुरू होता़ दरम्यान, तीन दिवसांपूर्वी महापालिकेने कुणाल बियरबारला नोटीस बजावून संबंधित बियरबार अतिक्रमणात असल्याने कारवाईचे संकेत दिले होत़े त्यानंतर सोमवारी रात्रीपासून बियरबारची जागा रिकामी करण्यास बारमालकाने सुरूवात केली होती़ अखेर मंगळवारी पहाटे 6 वाजेपासून तीन जेसीबींसह ट्राला, ट्रॅक्टरच्या सहाय्याने बियरबार पूर्णपणे जमिनदोस्त करण्यात आला़ दुपार्पयत ही कारवाई सुरू होती़ या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. तसेच नकाणे रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता़ मनपाचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होत़े दरम्यान, कुणाल व प्रिन्स बियरबारबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक होणार असून त्यात बियरबारचा परवाना व कागदपत्रे तपासून त्यात बदल होऊ शकतात़