धुळे - लक्ष्मी पूजनाच्या रात्री फटाके फोडण्याच्या वादावरुन झालेल्या हाणामारीत 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फटाके फोडण्यास मनाई केल्यानं दिनेश प्रल्हाद चौधरी या तरुणाची धारदार शस्त्रानं वार करुन हत्या करण्यात आली आहे. धुळ्यातील मनमाड जीन परिसरातील ही घटना आहे. याप्रकरणी आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा विठ्ठल शिंदे, तुषार विठ्ठल शिंदे, करण राजेंद्र सरोदे, भैय्या नागेश्वर सरोदे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र ते दोघे जण जखमी असल्यानं त्यांच्यावर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, क्षुल्लक कारणावरुन झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फटाके वाजवायला मनाई करणा-या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 12:43 PM