जैताणे : महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलतीचा लाभ मिळावा, अशी मागणी साक्री तालुका शिक्षक समन्वय समितीमार्फत करण्यात आली आहे. याबाबत समितीतर्फे साक्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे.२००५ ते २००८ या कालावधीत महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलतीचा लाभ शिक्षकांना प्राप्त झाला होता. परंतू त्यानंतर हा लाभ तालुक्यातील शिक्षकांना प्राप्त झालेला नाही. तरी शिक्षकांना योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन गटविकास अधिकाºयांनी दिले. याप्रसंगी समन्वय समितीचे साक्री तालुकाध्यक्ष विनोद पाटील, प्रकाश बच्छाव, अनिल अहिरे, संतोष शिंदे, चंद्रकांत सोनवणे, विलास गुलाबराव सोनवणे, मिलिंद वसावे, आधार बोरसे, शरद कानडे, विलास उत्तम सोनवणे, रवींद्र पेंढारकर, विक्रम पवार, रामचंद्र भलकारे आदी उपस्थित होते.
महाराष्ट दर्शन सवलतीपासून शिक्षक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:01 PM
साक्री : तालुका शिक्षक समन्वय समितीचे गटविकास अधिकायांकडे निवेदन
ठळक मुद्देगटविकास अधिकायांना निवेदन देतांना साक्री तालुका शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी.