सोनगीर : उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा येवू नये यासाठी जामफळ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे़सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे काम सोनगीरजवळ प्रगतीपथावर आहे़ गेल्या वर्षी जामफळ धरण ७० टक्के भरले होते़ यंदा आतापर्यंत धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणात पाण्याचा ओघ सुरूच आहे़ यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा जमा होत आहे़ या पाण्याचा धरण विस्ताराच्या कामात अडथळा येवू नये म्हणून जलसाठा कमी करण्याच्या दृष्टीने बुधवारी दुपारी सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे.शिंदखेडा तालुक्याच्या हद्दीतील जामफळ धरणाच्या विस्ताराचे काम सध्या वेगात सुरू आहे़ या धरणाचा विस्तार करून सुलवाडे जामफळ कनोली ही मोठी योजना तयार होत आहे़ या योजनेला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून मंजुरी मिळाली. ही योजना चार वर्षांत पूर्ण करणे अपेक्षीत आहे. या योजनेमुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील दोनशेपेक्षा अधिक गावांच्या शेतजनिमी सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे.जामफळ धरणात मुबलक पाणी साठा असला की परिसरातील शेत विहरींना लाभ होता़ तसेच पंचवीस हजार लोकवस्तीच्या सोनगीर गावाला या धरणातून पाणीपुरवठा होता़ यंदा पावसाने सुरवात जरी समाधानकारक असली तरी आगामी काळात पाऊस टिकून राहील हे सांगता येत नाही़ यामुळे पाण्याचा जास्त प्रमाणात विसर्ग करु नये अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे़
जामफळ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:20 PM