धुळे : शहरातील प्लॅस्टिक विक्रेत्या व्यापार्यांनी सोमवारी पुन्हा एकदा आयुक्तांची भेट घेऊन ५0 मायक्रॉॅनपेक्षा जाड असलेल्या पिशव्यांचे नमुने दाखवित त्यावर बंदी नसल्याचे स्पष्ट केले. मात्र आयुक्तांनी बंदी नसलेल्या पिशव्यांवर शिक्का असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.शहरात आयुक्तांनी ४ मे पासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी केली आहे. त्यामुळे ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असतांनाही पिशव्यांचा वापर सर्रासपणे सुरू होता. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी धुळ्यापासून सुरू करण्यात आली आहे. मात्र विक्रेत्यांनी सोमवारी आयुक्तांची भेट घेत पिशव्यांचे विविध नमुने त्यांना प्रत्यक्ष दाखविले. तसेच २0 मायक्रॉनपेक्षा जाड पिशव्यांवर बंदी नसल्याने कारवाई न करण्याचीही मागणी केली. मात्र ५0 मायक्रॉनपेक्षा जाड असलेल्या पिशव्यांवर शिक्का असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी त्या पिशव्या वापरण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सर्व विक्रेते उपस्थित होते.
प्लॅस्टिकबंदीबाबत विक्रेत्यांची आयुक्तांशी चर्चा
By admin | Published: June 02, 2015 4:38 PM