शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

भांडण सोडविणा:या तरुणाचे डोके फोडले

By admin | Published: February 21, 2017 12:12 AM

शिंदखेडा तालुका : दत्ताणे येथील घटना, चार जणांविरुद्ध गुन्हा

धुळे : दोघांचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाचे एकाने लाकडी दांडक्याने मारून डोके फोडले व इतरांनी मारहाण केली़ ही घटना शनिवारी रात्री शिंदखेडा तालुक्यातील दत्ताणे येथे घडली़ याप्रकरणी चार जणांविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दत्ताणे येथील भिलाटीत राहणा:या रामदास आधार भिल (व 21) या तरुणाच्या घरासमोर 18 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास रोहिदास आधार भिल व अनिल अशोक पाटील यांच्या मेमरी कार्डवरून भांडण सुरू होत़े तेव्हा रामदास हा दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेला व मेमरी कार्ड देऊन टाक, भांडण करू नको, असे रोहिदासला सांगितल़े त्याचा राग येऊन रोहिदासने लाकडी दांडक्याने रामदास याच्या डोक्यावर मारून डोके फोडून त्याला जखमी केल़े, तर अनिल पाटील, रावसाहेब अशोक पाटील व राजू भिल (सर्व रा़दत्ताणे) या तिघांनी  हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद रामदास भिल याने नरडाणा पोलीस ठाण्यात दिली आह़े त्यानुसार वरील चौघांविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक माळी करीत आहेत़ मध्यस्थी केल्याने वृद्धाला मारहाणशिरपूर तालुक्यातील बभळाज गावातील हंसराज वंजारा यांच्या दुकानासमोर दोन जणांचा आपापसात वाद सुरू होता़ त्यात बन्सीलाल मानसिंग जाधव (वय 60, रा़ बभळाज) यांनी मध्यस्थी केली़ त्याचे वाईट वाटून त्यांना रोहिदास साईदास जाधव व दिगंबर शोभा जाधव (दोघे रा़बभळाज) यांनी शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच यापुढे भानगडीत पडला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्यांना दिली़ ही घटना 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी बन्सीलाल जाधव यांच्या तक्रारीवरून वरील दोघांविरुद्ध थाळनेर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पा़े ह़ेकॉ. चव्हाण करीत आहेत़ विषारी पदार्थ सेवन केल्याने मृत्यूविषारी पदार्थ सेवन केल्याने उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. संतोष मळकू माळी (वय 47, रा़बिलाडी, ता़धुळे) असे मयताचे नाव आह़े त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5़45 वाजेच्या सुमारास गावाजवळ काहीतरी विषारी पदार्थ सेवन केला़ त्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुलगा सुनील माळी याने उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल़े तेथे उपचार सुरू असताना 19 रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला़ डॉ़ नितीन देवरे यांनी तपासणी करून मृत घोषित केल़े याबाबत पो़कॉ. सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.