आॅनलाइन लोकमतधुळे : कोणत्याही बोर्डाच्या शाळेला शाळेतून कोणत्याही प्रकारच्या साहित्याची विक्री करता येत नाही. मात्र राज्यासह धुळे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून ठराविक प्रकाशकांचीच पुस्तके घेण्याची सक्ती केली जाते. ती सक्ती करू नये अशी मागणी राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे करण्यात आली. दरम्यान या संदर्भात राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे पदाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, तेथे अधिकारी नसल्याचे चक्क शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच निवेदन चिकटवले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातीलराज्यातील सर्व भाषांतील व सर्व पॅटर्न (सीबीएससी, आयसीएससी,राज्यबोर्ड, एनसीईआरटी) ज्या शाळांना दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षासाठी आपल्या शाळेला लागणाºया क्रमिक पुस्तकांच्या याद्या लेखक व प्रकाशकांच्या नावासह शाळेच्या नोटिस बोर्डवर विद्यार्थ्यांना निकाल असतो, त्याचवेळी देण्यात याव्या. त्याची एक प्रत स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना सुद्धा उपलब्ध करून द्यावी. जेणे करून सर्व पुस्तके बाजारात सर्वत्र उपलब्ध राहतील. कोणाचीही मनमानी होणार नाही. विद्यार्थ्यांना योग्य ती वह्या, पुस्तके स्टेशनरी आपल्या आवडीच्या दुकानातून आपल्या बजेट प्रमाणे घेता येतील. दोन महिने अगोदर पुस्तकांच्या याद्या दिल्यास पालकांना देखील फायदा होईल. कारण जून महिन्यात शाळेची फी, गणवेश,शुज, बॅग,वह्या,पुस्तके असा बराच खर्च हा होत असतो.ज्या शाळेने निकालाच्या दिवशी पुस्तकांची यादी दिली व नियमांचे उल्लंघन करत असेल, त्या शाळेविरुद्ध शिक्षणाधिकारी यांनी कारवाई करावी. याची दखल घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला.दरम्यान राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे पदाधिकारी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले असता, तेथे अधिकारी नसल्याने, त्यांनी अहिरे यांच्या खुर्चीलाच निवेदन चिपकवले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा चावरा हायस्कूलकडे वळविला. तेथे चावरा हायस्कुलचे फादर यांना निवेदन देवून चर्चा केल्याची माहिती राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. यावेळी धंनजय चांगरे, निखिल वाघ, निखिल डोमाळे, राज कोळी, पियुष पवार, भूषण पाटील, ऋषी चव्हाण, एजाज शेख, लोकेश रणदिवे, महेश पाटोळे आदी उपस्थित होते.
धुळे येथे शिक्षणाधिकाऱ्याच्या खुर्चीला चिटकविले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:30 AM
इंग्रजी माध्यमातील शाळांकडून शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नये अशी निवेदनाद्वारे मागणी
ठळक मुद्देशिक्षणाधिकारी कार्यालयात नसल्याचे खुर्चीला दिले निवेदनइंग्रजी शाळांनी शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नये