लोकमत न्यूज नेटवर्कधुळे (कॉ.शरद पाटील विचारमंच) : कॉ.अण्णा भाऊ साठे १० वे साहित्य संमेलनाच्या वतीने अण्णा भाऊ साठेंच्या जीवनावर आधारित विदयापीठ स्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संमेलनाच्या दुसºया दिवसाच्या पहिल्या सत्रात पार पडले़ धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, व जळगाव येथील स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते.कॉ.अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री प्रतिमा, कॉ.अण्णा भाऊ साठेंची प्रबोधनात्मक चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कॉ.अण्णा भाऊ साठेंचे योगदान या विषयवार स्पर्धा घेण्यात आली यात प्रथम प्रथम जे.डी.बोरसे,व्दितीय गणेश उफाडे , तृतीय राजेश उफाडे, उत्तेजनार्थ वैभव जगदेव या यशस्वी स्पर्धकांना कॉ. भालचंद्र कानगो यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले स्पधेर्चे समन्वयक प्रा.गजेंद्र जगदेव हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गजेंद्र जगदेव यांनी केले. बक्षिसपात्र व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कॉ.अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन राज्य स्तरीय संयोजन समिती आणि आणि समता शिक्षण संस्था संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे़