लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पुरवठा विभागामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप सुरू झाले आहे़ तालुक्यातील बोरीस, लामकानी गावात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते गुरूवारी मोफत धान्यवाटप करण्यात आले़लॉकडाउनमध्ये उदरनिर्वाहासाठी गरीबांना मोफत तांदूळ वाटपाची घोषणा शासनाने केली होती़ त्यानुसार पुरवठा विभागाने वितरण सुरू केले आहे़ आमदार पाटील यांनी गुरूवारी रेशन दुकानांवर जावून दुकानदार आणि ग्राहकांशी चर्चा केली़ गावागावातील शेवटच्या माणसापर्यंत मोफत धान्य पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे़ दुकानदारांसह ग्राहकांच्याही अडचणी सोडविल्या जातील, असे आश्वासन आमदार पाटील यांनी यावेळी दिले़यावेळी बोरीस येथे चंद्रभान देवरे, तुकाराम देवरे, देवराम बेहेरे, तानकु सोनवणे, रेशन दुकानदार भरत वाघ, दिलीप गिरासे, लामकानी येथे उपसरपंच धनराज महाले, डॉ़ युवराज चौधरी, बाजीराव महाले, रेशन दुकानदार जयेश सोनार, नाना पाकळे, मयुर अहिरराव, पंकज मराठे, पंकज तलवारे, दत्ता तडवी, तलाठी उमेश चव्हाण आणि पुरवठा कर्मचारी आदी उपस्थित होते़
आमदारांच्या हस्ते धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 9:08 PM