धुळे: महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच जाहीर केल्या प्रमाणे माहे मे व जून मध्ये एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ एप्रिल पासून वाटपास सुरुवात झाली आहे. शहरामध्ये २८ एप्रिल पासून वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत 3 किलो गहू ८ रुपये प्रतिकिलो व २ किलो तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो प्रतिव्यक्ती मिळणार आहे.जिल्ह्यातील १९१ गावात धान्य पोहचले असून वाटप सुरू करण्यात आलेली आहे. धुळे शहरांमध्ये काही ठिकाणी कंटेनमेंट झोन असल्याने धान्य पोहोचण्यास उशीर होत आहे. तरी नागरिकांनी संयम राखून धान्य प्राप्त करून घ्यायचे आहे.
जिल्ह्यामध्ये एपीएल केशरी कार्डवर धान्य वितरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:56 PM