शिंदखेडा : कोरोना संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्यामुळे दोन वेळची गुजराण कशी करावी, असा प्रश्न या गरीबांपुढे पडला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथील कर्नावट परिवाराने वरुळ घुसरे येथे हातमजुरी करणाºया १०० कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले.कन्हैयालालजी कर्नावट, बाबूलाल कर्नावट, लखीचंद कर्नावट, भुरमल कर्नावट, कल्पेश कर्णावट या सर्वांनी आपल्या वरुळ घुसरे या मूळ गावाचे ऋण फेडावे म्हणून आपल्या जळगावच्या श्री डॉक्टर विल्सन फार्मा या कंपनीच्या माध्यमातून सुमारे १०० गोरगरीब कुटुंबांना एक महिना पुरेल इतका किराणा माल वाटप केला आहे.तर कर्नावट परिवारामधील सदस्य भागचंद कर्नावट, राजमल कर्नावट यांनी तालुक्यात जैन संघटनेच्या ‘डॉक्टर आपल्या दारी’ या फिरत्या उपक्रमांतर्गत सुरु असलेल्या योजनेत मोठा हातभार लावत सुमारे ५० हजार रुपयांची औषधी आपल्या जळगावस्थित विल्सन फार्मा कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.वरुळ घुसरे या गावात दरवर्षी पाणीटंचाई भासते. त्यामुळे गेल्यावर्षी देखील भीषण पाणीटंचाई असताना भागचंद कर्नावट यांनी गुरांसाठी स्वखर्चातून टँकर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली होती.या किराणा किट वाटपप्रसंगी वरुळ घुसरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश गिरासे, माजी सरपंच शिवदास माळी, प्रकाश पाटील, विलास माळी, भटू धनगर, प्रवीण मराठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गरजूंना किराणा मालाचे वाटप करण्यात आल्याने हतबल झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.लॉकडाऊनमध्ये गोरगरीब गरजूंना मिळाला दिलासाकोरोना संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे मोलमजुरी करणाºया कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना आधार देण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे येत आहेत. दरम्यान, वरुळ घुसरे येथे कर्नावट परिवाराने १०० गरजू कुटुंबाला महिनाभर पुरेल इतका किराणा माल वाटप केल्याने या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
१०० गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 12:35 PM