पिंपळनेर : श्री खंडोजी महाराज नामसप्ताह महोत्सवानिमित्त आयोजित श्री ज्ञानेश्वर महाराज रचित हरिपाठ अभंग निरूपण स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले.अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे, हभप धनंजय महाराज देशपांडे, वसंत कोतकर, हरीश कोठावदे, अशोक देवरे उपस्थित होते. स्पर्धेत महिला गटात- प्रथम शितल सुदाम चौधरी, द्वितीय-संजीवनी निलेश चव्हाण, तृतीय- दिपाली दत्तात्रेय दळवेलकर, तर उत्तेजनार्थ शुभांगी दयानंद कोतकर, पुरुष गटात- प्रथम भगवान हिरामण बागुल, द्वितीय- विजय साळवे, तृतीय- निलेश पंढरीनाथ मानकर, उत्तेजनार्थ- ज्ञानेश्वर विश्वास देशमुख, नारायण वामन वाघ, तनुश्री भरत बागुल, विद्यार्थी गटात- प्रथम पवन हिरालाल निकम, द्वितीय-वैशाली सुरेश पुरानिक, तृतीय- मोनिका राजेंद्र निकम, उत्तेजनार्थ योगेश्वरी चंदन सूर्यवंशी व ज्ञानेश संजय शिंपी यांना देण्यात आले. यशस्वीतांना रामदास बेनीराम कोठावदे यांच्या स्मृतीनिमित्त हरीश कोठावदे व मान्यवरांच्याहस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दरम्यान, ५ रोजी दुपारी ३ वाजता मठाधिपती योगेश्वर महाराज हे श्री खंडोजी महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत.
हरिपाठ अभंग निरूपण स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 10:27 PM