आॅलनालइ लोकमतधुळे : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेसाठी प्रवेश न मिळू शकलेल्या परीक्षार्थींनी आज सकाळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या निवासस्थानी धडक दिली. मात्र जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानी प्रवेश न मिळाल्याने परीक्षार्थींनी आमदार अनिल गोटे यांची भेट घेऊन आपली कैफीत मांडली. दरम्यान शहरात सर्वच केंद्रावर पहिला पेपर सुरळीत पार पडला. धुळे शहरात सकाळच्या सत्रात ९ केंद्रावर टीईटीची परीक्षा होत असून, यासाठी ३ हजार ६६४ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. पहिला पेपर सकाळी १०.३० ते १ यावेळेत होता. पहिल्या सत्रात दहा वाजेनंतर येणाºया परीक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही अशी स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने अगोदरच दिलेली होती. असे असतांना काही परीक्षार्थी शहरातील कनोसा कॉन्व्हेंट, जयहिंद हायस्कूल, शिवाजी हायस्कूल या केंद्रावर सव्वा दहा पर्यंत पोहचले. वेळेत न आलेल्या परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात आला. असे असतांनाही काहींनी प्रवेशद्वारावर चढून आत प्रवेश केला. मात्र त्यांनाही बाहेर काढण्यात आले. वेळेत न पोहचू शकल्याने, जवळपास १०० ते १५० परीक्षार्थी पहिल्या पेपरपासून वंचीत राहिले. परीक्षेसाठी प्रवेश मिळावा म्हणून वंचीत राहिलेल्या परीक्षार्थींनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या निवासस्थानी धडक दिली. मात्र या सर्व विद्यार्थ्यांंना जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाबाहेरच अडविण्यात आले. त्यामुळे या परीक्षार्थींनी आपला मोर्चा आमदार अनिल गोटे यांच्याकडे वळविला. आमदार गुलमोहर विश्रामगृहात असल्याचे समजताच, सर्व परीक्षार्थी त्याठिकाणी पोहचले. त्यांनी आमदार गोटे यांच्यासमोर आपली कैफीयत मांडली. आमदारांनी शिक्षण संचालक रामचंद्र जाधव, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. या परीक्षार्थींना शिक्षण विभागाला निवेदन देण्याचे सांगून शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परीक्षार्थी माघारी परतले.
धुळ्यात ‘टीईटी’साठी प्रवेश न मिळालेल्या परीक्षार्थींची जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानी धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:32 PM
परीक्षार्थींनी आमदारांसमोर मांडली कैफियत, १५० विद्यार्थी परीक्षेपासून वंचीत
ठळक मुद्देधुळ्यात सकाळच्या सत्रात ९ केंद्रावर परीक्षा सुरूवेळेत न पोहचलेले जवळपास २०० विद्यार्थी परीक्षेपासून वंचीतपरीक्षार्थींनी घेतली आमदार गोटे यांची भेट