धुळे ; जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर सोमवारी स्पष्ट झाले आहे. २३ जागांपैकी २२ जागा बिनविरोध झालेल्या आहेत, तर संक्रमण क्षेत्राच्या एका जागेसाठी २१ सप्टेंबर २२ रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या २३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. २३ जागांसाठी ३२ अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीसाठी सोमवारी शेवटचा दिवस होता. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. २३ पैकी २२ जागा बिनविरोध झालेल्या आहेत. यात ग्रामीणच्या १५ व शहरी भागाच्या ७, अशा २२ जागांचा समावेश आहे. संक्रमण क्षेत्राच्या (नगरपंचायत) एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात असल्याने त्यासाठी २१ रोजी मतदान होणार आहे.