धुळे : जिल्हा पोलीस दलातील वाहनांची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे पोलीस दलासाठी नवीन वाहने मिळवून देण्याचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस दलाला २२ चार चाकी आणि वीस दुचाकी गाड्यांचे लोकार्पण पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव आदी उपस्थित होते.
इतरही जिल्ह्यात राबवला जाईल हा उपक्रम
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलाला वाहने खरेदीसाठी एक कोटी ८५ लाख लाख रुपयांचा आणि ड्रोन खरेदीसाठी १० लाख रुपयांचा निधी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केला होता. त्या निधीतून २२ चारचाकी आणि २० दुचाकी वाहनांची खरेदी करण्यात आले. तसेच ड्रोनही खरेदी करण्यात आले. राज्यातील हा पहिलाच अभिनव उपक्रम असल्याचं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. या धर्तीवर राज्यात इतरही जिल्ह्यात असाच उपक्रम राबवला जाण्याची शक्यता आहे.
गुन्हे कमी करण्यास होईल मदत
पोलिसांकडे असलेल्या खराब वाहनांमुळे अनेक गुन्हेगार हातातून निसटतात. मात्र आता नवीन वाहनांमुळे गुन्हेगार पकडण्यात गती येईल. त्यामुळे गुन्ह्यांवरही नियंत्रण मिळवता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले.
पीएचसीना मिळणार नवीन रुग्णवाहिका
करोनाने सध्या सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यासाठीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला असून, लवकरात लवकर आरोग्य विभागास या नवीन रुग्णवाहिका मिळणार असल्याचे पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितले.
लवकर लवकरच सुरू होणार ऑक्सिजन प्लांट
सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. तसेच आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाई भासू नये म्हणून लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केलेला केली जाणार असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
कोट..
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला वाहने देण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. त्यामुळे पोलीस दल आणखीन सक्षम होऊन गुन्हेगारांवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.
अब्दुल सत्तार
पालकमंत्री तथा ग्रामविकास महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री