लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यात आखाडे येथे आठ दिव्यांग लाभार्थींना ग्रामपंचायत कर वसुलीतून आर्थिक सहाय्य धनादेश देण्यात आले आहेत. उर्वरीत दिव्यांगांना ग्रा.पं.चा कर जसा वसूल होईल त्यातून आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सोमवार १ जुलै रोजी ग्रा.प.कर वसुलीतून ५ टक्के आर्थिक सहाय्य प्रत्येकी एक हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. आठ दिव्यांगांमध्ये रामा गोपा ठेलारी, आत्माराम बाबुराव कापडे, कलाबाई कागा ठाकरे, सुनिता गिरधर भिल, मोहनीस मनोहर ठाकरे, आक्काबाई भिला माळचे, निर्मलाबाई प्रल्हाद पवार, मच्छिंद्र ज्योतीराम भवरे यांचा समावेश आहे.सोमवारी सरपंच श्रावण भवरे, गटनेते व उपसरपंच शिवलाल ठाकरे, ग्रामसेवक महारु विठ्ठल गायकवाड, पोलीस पाटील, योगेश खैरनार, रामोजी गजन भिल, रोहिदास भिल, निंबा नथ्थू ठाकरे, आबा महाराज, भरत काळू ठाकरे, कृषीमित्र दिपक तोंगल ठाकरे व गावकरी उपस्थित होते. या व्यतिरिक्त राहिलेले दिव्यांग लाभार्थ्यांना जसजशी ग्रामपंचायतीची वसुली होईल तसे वसुलीतून आर्थिक सहाय्य नंतर देण्यात येणार आहेत, असे उपसरपंच शिवलाल ठाकरे, ग्रामसेवक गायकवाड यांनी यावेळी नमूद केले आहे.
आखाडे येथे दिव्यांगांना सहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 10:00 PM