लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रांचे (कंट्रोल युनिट/बॅलेट युनिट) ड्रॉ पध्दतीने वितरण निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत झाले़मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमीत्ताने राज्य निवडणूक आयोगाकडून एकुण १५०० बॅलेट युनिट प्राप्त झाले होते़ त्यात तपासणीअंती १२६२ बॅलेट युनिट कार्यरत आहेत. तर ८५० कंट्रोल युनिट प्राप्त झाले आहेत़ मतदान केंद्रनिहाय आवश्यक असलेल्या १०९० बॅलेट युनिट व ५२० कंट्रोल युनिट वितरणाची कार्यवाही लॉटरी पध्दतीने सोमवारी आयुक्तांच्या दालनात झाली़ उर्वरीत यंत्रे राखीव ठेवली जाणार आहेत़ या प्रक्रियेवेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनीधी, निवडणुक निर्णय अधिकारी व पत्रकार यांनी प्रथम संगणकीय प्रणालीद्वारे ‘रॅण्डमाईज’ प्रक्रिया समजावून सांगून ड्रॉ पध्दतीने करण्यात आली व त्यानुसार संबंधित उपस्थितांच्या समक्ष व साक्षीने मतदान यंत्रे वाटप निश्चित करण्यात आले. प्रत्येकी दहा मतदान यंत्रे असलेल्या पेट्यांच्या क्रमांकानुसार ही प्रक्रिया पार पडली़ निवडणुक निर्णय अधिकाºयांकडे सोपविण्यात आलेल्या मतदान यंत्रामध्ये आज मंगळवारपासून शासकीय गोदाम येथे असलेल्या मतमोजनी केंद्रात प्रभागनिहाय उमेदवारी यादी मतदान यंत्रात बसविणे, मॉकपोल घेणे, तसेच डेमो मतदान प्रक्रिया राबविणे याबाबत संबंधित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचे समक्ष कार्यवाही करणेत येणार आहे़ या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम बांदल, नितीन कापडणीस व शरद पवार उपस्थित होते़ तर उर्वरीत निवडणूक निर्णय अधिकाºयांचे प्रतिनिधी उपस्थित होते़ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये वाल्मिक दामोदर, हरीश्चंद्र लोंढे, गिरीष भामरे, हिमांशु परदेशी, विनोद पटवारी, गौतम पारेराव, वसंत पाटील व तज्ज्ञ मार्गदर्शक महेश पोंक्षे, उपायुक्त रविंद्र जाधव, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते़ एक खिडकी कार्यालयात गर्दी़महापालिका निवडणूकीच्या प्रचाराला आजपासून केवळ ४ दिवस उरलेले असतांनाही अजून प्रचार परवानगी घेण्यासाठीच एक खिडकी योजनेच्या कार्यालयात गर्दी दिसून येत आहे़ सोमवारपर्यंत सुमारे ५५० अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ३०० जणांना प्रचारासाठी परवानगी देण्यात आली आहे़ तसेच ७० व्हीडीओ सींडीची तपासणी करून त्यांनाही मान्यता देण्यात आली आहे़ मतदान यंत्रे केंद्रांवर पोहचविण्यासाठी ४० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे़ दोन दिवसांसाठी ही व्यवस्था राहणार असून प्रत्येक बस मतदान यंत्र नेणे व आणणे अशा दोन फेºया करणार आहे़ त्यावर प्रति बस प्रति फेरी १३ हजार रुपए खर्च येणार आहे़ त्यात वाहन दर, वाहन विमा, सेवाकर, अनामत रक्कमेचा समावेश असेल़ बसेसवर एकूण १० लाख ४० हजार रुपए खर्च होणार आहेत़ मतदान केंद्रांवर नेमलेल्या कर्मचाºयांना केंद्रांचे वितरण देखील वेळेवर केले जाणार आहे़ त्यामुळे संबंधित कर्मचाºयांना कोणते केंद्र मिळते, याची उत्सुकता असणार आहे़
मतदान यंत्रांचे प्रभागनिहाय वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:47 PM