धुळे : गेल्या तीन वर्षात अनेक कामे सूचवूनही ते कामे होत नाही, भूमिपूजन झालेली कामेही अपुर्णावस्थेत आहे. अशा परिस्थतीत जि.प. सदस्य म्हणून राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत शिंदखेडा तालुक्यातील मेथी गटातील भाजपचे जि.प. सदस्य ज्ञानेश्वर आनंदराव भामरे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा शुक्रवारी जि.प. अध्यक्ष अश्विनी पवार यांना पाठविलेला आहे.तसचे त्यांनी पक्षाचाही राजीनामा दिला आहे.
दिलेल्या पत्रात भामरे यांनी म्हटले आहे की, मेथी गटाचा सदस्य म्हणून मी गेल्या तीन वर्षापासून काम करतोय. ग्रामीण भागातील नागरिकांच्या पायाभूत सुविधांबाबतचे प्रश्न मी सातत्याने जिल्हा परिषदेच्या विषय विषय समिती, सर्वसाधारण सभा सभेत मांडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांवर या जिल्हा परिषद मध्ये गुन्हे दाखल केले गेले अशा प्रकारचा अन्याय गेल्या तीन साडेतीन वर्षात होत आला आहे. तसेच मी सांगितलेली कामे प्रशासनाने नोंदवून घेतली. काही वेळा ती कामे मंजूर झाले असे सांगण्यात आले. पण नंतर ती कामे सुरू करण्याच्या संबंधाने कुठलीही हालचाल झाले नाही.
त्यामुळे नागरिकांचा रोष आणि नाराजी लक्षात घेता मला नैतिक पातळीवर भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहण्याचा अधिकार उरत नाही. त्यामुळे मी जिल्हा परिषदेचे अध्यक्षांकडे माझ्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. हा राजीनामा मंजूर करावी करावा अशी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी भाजपचाही राजीनामा दिला आहे. यापुढे जनतेला अपेक्षित काम करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असे पत्रकात म्हटले आहे.