धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमेवरील गस्त वाढवावी. दुसºया जिल्ह्यातून कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देवू नका. १ एप्रिल नंतर आलेल्या नागरिकांची माहिती घेत त्यांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, डॉ. एम. पी. सांगळे, संजय गायकवाड, भीमराज दराडे, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यादव म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य असेल. नागरिकांमध्ये अद्यापही या विषाणूविषयी गांभीयार्चा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कार्यवाही करावी. साक्री येथील मृत रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा कशी झाली याचाही शोध घ्यावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी सर्वंकष काळजी घ्यावी. मनुष्यबळाचा आराखडा तयार करावा. आवश्यकता भासल्यास निवृत्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मदत घ्यावी. स्वयंसेवकांची मदत घेवून त्यांना प्रशिक्षित करावे. होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांवर देखरेख ठेवावी. त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी माहिती घ्यावी. तसेच विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विषय पत्रिका तयार करून कार्यवाही करण्यात येईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पयार्यी आराखडा तयार ठेवावा तसेच मनपाने खासगी रुग्णालये तत्काळ सुरू होतील, असे नियोजन करावे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केलेल्या नागरिकांसाठी पुरेशी व्यवस्था करावी. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्त तपासणीसाठी कीट, औषधे, पीपीई, मास्कसह संरक्षणाची साधने पुरेसी उपलब्ध करुन घ्यावीत. नागरिकांनीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचनांचे पालन करावे असेही जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले़
जिल्ह्यात कोणालाही प्रवेश देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:14 PM