लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करू नका या संदर्भातले निवेदन येथील आदिवासी जनजागृती संघटनेतर्फे प्रांताधिका-यांना देण्यात आले़२७ रोजी नायब तहसिलदार एस़व्ही़बागले यांना या संदर्भातले निवेदन देण्यात आले़निवेदनात, धनगर, धनगड हे दोन्हीही शब्द अनुसुचित जमातीच्या सूचीत नाहीत़ धनगड हि जमातच नाही़ महाराष्ट्राच्या सुचित धांगड या शब्दाचे भाषांतर धनगड असे केले जात आहे़ पण सदर शब्दाचे भाषांतर धांगड असे हवे़ महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जमातीच्या यादी क्ऱ३६ वर ओरॉन जमात आहे, त्या जमातीला आपल्या देशाच्या ७ राज्यांच्या सुचित दर्शविले आहे़ महाराष्ट्रात ओरॉन, धांगड जमात वास्तव्यास नाहीत, पण सुचित समाविष्ठ आहे़ ओरॉन, धांगड जमातीचे लोक धर्मीज नावाच्या महादेवाची पूजा करतात़ अन्नाकौरी किंवा महाधारी देवता यांच्यात आहेत़ त्यांचा मुख्य सण सरहूल आहे़ ओरॉन व धांगड लोक उरीया किंवा हिंदी भाषा बोलतात़ धनगर जातीचा या जमातीशी तिळमात्र संबंध नाही़एकंदरीत ओरॉन धांगड या जमातीशी धनगर या जातीचा तिळमात्रही संबंध नाही़ धनगर ही जात आहे, जमात नाही़ ते आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाहीत़ धनगर आदिवासी नाहीत़ धनगर जातीच्या नेत्यांची मागणीच असंविधानिक आहे, त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची धनगराची शिफारस केंद्र सरकारकडे करू नये़ राज्याच्या अनुसुचित जमातीच्या यादीत ओरॉन व धांगड आहे़ ते धनगड किंवा धनगर नाही़ अन्यथा सरकार विरोधात आदिवासींचा संघर्ष मोठ्या प्रमाणात उभा राहील असे देखील निवेदनात म्हटले आहे़ यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश पावरा, आकाश पावरा, विकास मुखडे, प्रा़रमेश पावरा, सुजित पाडवी, निलेश पावरा, संतोष पावरा, रामेश्वर पावरा, सुंदर पावरा, जगदिश पावरा, विकास वळवी, मनोहर वळवी, विजय पावरा आदी उपस्थित होते़
धनगर जातीला अनुसुचित जमातीत समावेश करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 5:44 PM