लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत महाराष्ट्रात मेगा भरती थांबविण्यात यावी, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीने केली आहे. याबाबत दोंडाईचा तहसिल कार्यालयात मंडळ अधिकारी आर.टी. मोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.दोंडाईचा येथील धनगर समाज संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्टÑात मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजाला पण तात्काळ आरक्षण द्यावे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने मराठा समाजासाठी शासकीय नोकर मेगाभरती थांबवली होती. आता मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मेगाभरतीस सुरुवात केली जात आहे. धनगर समाजाला आरक्षण देन्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत. म्हणून धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मेगाभरती करू नये, भरती झाल्यास धनगर समाजातील तरुण भरतीपासून वंचित राहणार आहेत, तरुणांचे मोठे नुकसान होणार आहे. मेगाभरती झाल्यानंतर नवीन भरती लवकर होत नसल्याने आरक्षणाचा फायदा धनगर समाजातील तरूणांना होणार नाही. त्यामुळे शासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगाभरती करू नये, अशा मागणीचे निवेदन धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष सुनिल धनगर, दोंडाईचा शहराध्यक्ष संजय लांडगे, जयवंत बोरसे, पप्पू धनगर, वाल्मिकी धनगर, नरेंद्र बाविस्कर, शैलेश बोरसे, टायगर धनगर, वकील धनगर, सदाशिव भलकार, कृष्णा धनगर, अविनाश धनगर, दिपक काकडे आदींनी केली आहे.
धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती करु नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:27 PM