कोरोनाची लागण झाली म्हणजे सगळे संपले असे नाही. जिल्ह्यातील १७ रूग्ण ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. कोरोनावर मात केलेल्या रूग्णांमध्ये १ वर्षाच्या मुलाचा तसेच ७० वर्षाच्या वृद्धेचाही समावेश आहे. कोरोना विरूद्ध लढतांना सर्वात आधी नकारात्मकता दुर केली पाहिजे असे मत हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्तपेढी प्रमुख तथा समन्वयक डॉ. दिपक शेजवळ यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.प्रश्न : हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत किती कोरोना कीट उपलब्ध आहेत ?उत्तर: श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेले १ हजार ५०० कीट उपलब्ध आहेत. प्रयोगशाळेतील चाचण्यांची क्षमता बघता कीट पुरेशा प्रमाणात शिल्लक असल्याचे म्हणता येईल.प्रश्न : आतापर्यंत किती कीट वापरण्यात आले आहेत ?उत्तर : आपण जास्तीत जास्त चाचण्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत ५ हजार ५०० कोरोना कीट वापरण्यात आले आहेत. म्हणजेच ५५०० रूग्णांच्या नमुन्यांची तपासणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. धुळ्यासोबतच जळगाव, मालेगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील रूग्णांचे स्वब आपल्या प्रयोग शाळेत तपासले जात आहेत.प्रश्न : जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या लक्षणीय आहे त्याबद्दल काय सांगाल ?उत्तर : योग्य उपचाराने रूग्ण कोरोनामुक्त होऊ शकतो हे आपण सिद्ध केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणाजे सत्तरी गाठलेले, अनेक व्याधी असलेल्या रूग्णांनीही कोरोनावर विजय मिळवला आहे. कोवीडचा आजार नविन असल्यामुळे तसेच काही रूग्ण अत्यवस्थ अवस्थेत तर काही लक्षणे अधिक तीव्र झाल्यावर आल्यामुळे सुरूवातीला मृत्यू झाले. मात्र आता योग्य उपचार, समुपदेशन व सकारात्मकता यामुळे कोरोना बाधीत रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहेत.तरीही नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे़़
कोरोनाला घाबरू नका, मात्र खबरदारी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 11:52 AM