लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, तसेच तबला व गटार वादनाचे उत्कृष्ट सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी सर्वांची दाद मिळविली. निमित्त होते क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्टÑ राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे. वलवाडी येथील चावरा इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये झालेल्या या महोत्सवाचे उदघाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विलास कर्डक यांच्याहस्ते झाले. सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत हा युवा महोत्सव झाला. यात जिल्ह्यातील जवळपास १२ संघाचे विद्यार्थी सहभाग झाले होते. विजेत्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. परीक्षक म्हणून प्रा. सुधाकर पाटील, प्रा. भगवान जगदाळे, प्रा. डेव्हीड सिंग, डॉ. सुजाता माडे, रत्ना वाघ, योगिता चव्हाण यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी ए.आर. बोथीकर,नारायण धनगर, ज्ञानेश्वर जाधव, राहूल देवरे, योगेश देवरे, मदन गावीत, दीपक बाविस्कर, डी. जी. वाघेला यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, तबला वादनाच्यावेळी अनेकांनी उपस्थित राहून त्याला दाद दिली होती़ त्यामुळे हा कार्यक्रम बराचवेळ सुरु होता़ अनेकांनी आपली उपस्थिती नोंदविली होती़ स्पर्धेचे विजेते असेतबला वादन- प्रथम पुष्कर संजय सूर्यवंशी, द्वितीय पार्थ गजेंद्र घोडके. हार्मोनियम- प्रथम अनुराग भगवान जगदाळे, द्वितीय शुभम गुलाब धनगर. शास्त्रीय गायन-प्रथम आशुतोष भगवान जगदाळे, द्वितीय अनुराग जगदाळे. लोकगीत- प्रथम ओंकार संगीत विद्यालय दोंडाईचा. गिटार- प्रथम डॅनियल सिंग, द्वितीय कृतिका नेवे. वकृत्व-प्रथम आदित्य मेनाने, द्वितीय योगेश महाले. शास्त्रीय नृत्य- प्रथम योगेश महेश महाले.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळाली दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 9:58 PM