आॅनलाइन लोकमतधुळे (कॉ.शरद पाटील विचारमंच) : दलित समाजावर होणाऱ्या अन्याय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. तोच विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडत समानतेचा संदेश दिला.समाजाच्या अन्यायाला त्यांच्या साहित्यातून वाट मोकळी करून दिली. महाराष्ट्रात सुरू झालेली दलित साहित्याची चळवळ देशव्यापी झाली.दलित साहित्याने ख?्या अथार्ने अन्यायाला वाट मोकळी करून दिली, एक चेहरा दिला असे प्रतिपादन युजीसीचे माजी अध्यक्ष तथा संमेलनाध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित कॉ. अण्णा भाऊ साठे १०वे दोन दिवसीय साहित्य संमेलन येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात आजपासून सुरू झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. सुखदेव थोरात बोलत होते.व्यासपीठावर कामगार नेते कॉ. भालचंद्र कानगो, उदघाटक विचारवंत प्रा. गोपाळ गुरू (मुंबई), स्वागताध्यक्ष प्रा. विलास वाघ (पुणे), साहित्तिक उत्तम कांबळे, प्राचार्य डॉ. जे.बी. अडसुळे होते.डॉ. थोरात पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी दलितांची आर्थिक बाजू आणि सामाजिक बाजू मांडली आहे. मर्क्सवादात या गोष्टी मांडल्या नाहीत त्याची सुरवात अण्णा भाऊ साठे यांनी केली. दलित साहित्याचा अभ्यास करताना, दलितांचे प्रश्न, त्यांची कारणे, आणि उपाय यावर विचार करणे आवश्यक आहे. जाती, धार्मिक भेदभावावर लक्ष देऊ नका, आर्थिक सक्षमतेचा विचार करा. परंतु ही संकल्पना अजूनही दुर्लक्षित आहे. यावेळी त्यांनी मार्क्सवादात दुर्लक्षित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विचारवंत अँजेल्स यांचा विचारांचा समन्वय याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. डॉ. बाबासाहेबांचे आर्थिक विचार यावरही त्यांनी प्रकाश टाकला.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे.बी. अडसुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रीती वाहने यांनी तर आभार डॉ. दीपक बाविस्कर यांनी मानले. या संमेलनासाठी धुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कॉ.अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून समानतेचा संदेश दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 6:24 PM
डॉ. सुखदेव थोरात: कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनास थाटात सुरूवात
ठळक मुद्देदोन दिवसीय साहित्य संमेलनाला सुरूवातअनेक मान्यवरांची उपस्थिती