लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. तरुणाई व लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पांझरा नदीच्या पात्रात पाळणे, ड्रॅगन ट्रेन व इतर मनोरंजनाचे साहित्य आले आहेत. परंतु, काही व्यावसायिकांनी ड्रॅगन ट्रेन बसविताना चक्क नदी पात्रात लाकडाच्या फळ्या तर काहींनी दगडावर ही ट्रेन उभी केली आहे. त्यामुळे भाविकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरम्यान, पांझरा नदीपात्राला लागून रस्ते विकासाची कामे सुरू असल्याने येथील परिसरात यात्रोत्सवानिमित्ताने मुरूम व मातीचा खच टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. परिणामी, या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकवीरा देवी यात्रोत्सवानिमित्त येथील परिसरात चैतन्यमय वातावरण आहे. भाविकांना आकर्षित करतील, अशा वस्तू विक्रीसाठी विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानावर ठेवल्या आहेत. खरेदी करणाºया भाविकांची संख्याही वाढत आहे. दुपारी कडाक्याचे ऊन असल्यामुळे यात्रेत दुपारी १२ ते ५ यावेळेत गर्दी कमी असली तरी सकाळी सहा ते बारा व सायंकाळी सहा वाजेनंतर यात्रेत गर्दी दिसून येत आहे. वाहनांना प्रवेशबंदी असतानाही घुसखोरी यात्रेत वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरीही बाहेर गावाहून येणारे भाविक त्यांची वाहने थेट देवीच्या मंदिरापर्यंत आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळच्यावेळी नेहरू चौक व पंचवटी परिसरात पोलीस राहत नसल्यामुळे त्याची संधी साधत अनेक भाविक त्यांची वाहने ही मंदिरापर्यंत घेऊन येतात. त्यानंतर ही वाहने बाहेर काढताना वाहनचालकांनाच मोठा त्रास होत आहे.
मंदिर परिसरात नाराळाच्या किंमतीत वाढमंंदिर परिसरात यात्रोत्सवानिमित्त येणाºया भाविकांची संख्या वाढत आहे. देवीला आलेले भाविक अहेर, ओटी व नारळ घेत असतात. भाविकांची गरज विचारात घेता, मंदिर परिसरातील विक्रेत्यांनी नाराळाच्या किंमतीत वाढ केली आहे. एक नारळ २५ ते ३० रुपये किंमतीने विक्रेते विक्री होत आहे. पूजेच्या साहित्यांमध्ये अहेराची साडी २०० ते २५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत भाविकांचा पाहिजे; त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात व्यवसाय वाढेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली.