धुळे : येथील राष्ट्रीय युवा योजना (दिल्ली) चे राष्ट्रीय संघटक नरेंद्र वडगावकर (धुळे) यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘भारत कि संतान’ या नाट्याला तारा आर्टस् अॅकॅडमी हैद्राबाद या सांस्कृतिक संस्थेने ‘नाट्य भूषण पुरस्कार’ देवून सन्मानीत करण्यात आले.तारा अॅकॅडमी हैैद्राबाद (तेलंगना) या सांस्कृतिक संस्थेच्यावतीेने एस.व्ही. विश्वविद्यालय, तिरुपती (आंध्रप्रदेश) येथे नुकतेच दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शास्त्रीय व लोकनृत्य महोत्सव २०२०’चे आयोजन करण्यात आले होते.महोत्सव उद्घाटनप्रसंगी रायुयोचे अध्यक्ष, ज्येष्ठ गांधी विचारक डॉ.एस.एन. सुब्बारावजी, हैद्राबाद विभाग लायन्स क्लबचे अध्यक्ष विजयकुमार, तेलंगनाचे कमिश्नर वरमनकृष्णा मोहनराव, तेलंगाना साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्रीनंदिनी शिवारेड्डी, गोविंद स्वामी कॉलेजचे प्राचार्य रमेश गारु आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी नरेंद्र वडगावकर यांना तारा आर्ट अॅकॅडमी या संस्थेचे ‘नाट्यू भूषण पुरस्कार’ शाल व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. नरेंद्र वडगावकर यांच्या दिग्दर्शीत ‘भारत की संतान’ हा कार्यक्रम सिंगामपूर, लंडन, तुर्की, बांगलादेश, श्रीलंका व संपूर्ण भारतात हा कार्यक्रम सादर करत आहेत. या महोत्सवात नरेंद्र वडगावकर यांनी तिरुपती येथील गोविंदस्वामी महाविद्यालयातील युवक-युवती यांच्यावतीने ‘भारत की संतान’ कार्यक्रम सुंदर सादर केला.तारा आर्ट अॅकॅडमीचे अध्यक्ष एस.राजेश व महोत्सव समन्वयक श्रीनिवास यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते. विविध राज्यातील युवा कलाकारांनी शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य सादर केली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते़नरेंद्र वडगावकर १९९१ वर्षापासून राष्ट्रीय युवा योजना या सामाजिक संस्थेमध्ये सामाजिक कार्य करत आहे. रायुयोच्या वतीने नरेंद्र वडगावकर यांच्या दिग्दर्शीत ‘भारत की संतान’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय १८ बहुभाषा, वेशभूषा व संस्कृति आधारीत एकात्मताचा संदेशाचा कार्यक्रम सादर करतात.
‘भारत की संतान’ला नाट्य भूषण पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:06 PM