ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 3 - पोलीस मागावर असल्याचा संशय आल्याने तळोदा येथून मालेगावकडे बेकायदेशीरपणे गुरे घेऊन जाणारा ट्रक शहरातील वडजाई रोडवर सोडून चालक फरार झाला़ अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ट्रकमध्ये निदर्यपणे बांधलेल्या 26 गुरांची सुटका केली़ ट्रकसह 9 लाख 40 हजार रूपये किंमतीची गुरे ताब्यात घेण्यात आली़ याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मुंबई- आग्रा महामार्गावरून ट्रकने (क्ऱ एम़एच 18 ए़सी 6383) गुरांची बेकादेशीरपणे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक भास्कर शिंदे, पो़ह़ेकाँ प्रदीप सोनवणे, नितीन पाटील, पो़काँ मुकेश जाधव, समीर पाटील यांनी शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास वडजाई रोड तपासणी सुरू केली़ तेव्हा कब्रस्थानाजवळ तो ट्रक उभा दिसला़ चालक फरार झालेला होता़ ट्रकची ताडपत्री उघडून बघितली असता, 26 गो:हे व बैल यांना कोंबून निर्दयपणे बांधलेले होत़े पथकाने ट्रकसह 9 लाख 40 हजारांची गुरे ताब्यात घेतली़ गुरांची सुटका करून त्यांना नवजीवन गोशाळेत सोडण्यात आल़े पोलीस मागावर असल्याचा संशय आल्याने ट्रक सोडून चालक फरार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आह़े याप्रकरणी मोहाडी पोलीस ट्रक चालकाविरूध्द महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5, 5 (अ) (1), 5 (ब), व भादंवि कलम 429 तसेच मोटार वाहन कायदा कलम 66/192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
गुरे घेऊन जाणारा ट्रक सोडून चालक फरार
By admin | Published: June 03, 2017 6:13 PM