लोकमत न्यूज नेटवर्कवारुड : शिंदखेडा तालुक्यातील वारूड परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकºयांसमोर निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात पावसाची नितांत गरज आहे.वारूडसह परिसरातील मेलाणे, जातोडे, पाष्टे, मुडावद, म्हळसर या गावात जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात अत्यल्प अशा पावसाने हजेरी लावली. या पावसाचे प्रमाण हे खूप कमी असल्याने हवी त्या प्रमाणात जमीन ओली झाली नाही. तरीही शेतकºयांनी पुढे चांगला पाऊस येईल, या आशेने खरीप हंगामाच्या पेरणीला वेग देत कापसासह कडधान्याची पेरणी केली. मात्र, त्यानंतर हवा तसा पाऊस न झाल्याने पिकांची परिस्थिती नाजूक बनली आहे. तसेच कोवळ्या पिकांना कीड खाऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.शेतकºयांनी खरीप हंगामासाठी विविध कार्यकारी सोसायटी, बँकेचे कर्ज, काहींनी लोकांकडून उसनवार पैसे घेऊन महागडी बियाणे घेत पेरणी केली. मात्र, आता वरुणराजाने पाठ फिरविल्यामुळे परिसरातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. पेरणीनंतर परिसरात पाऊस अत्यल्प आल्यामुळे जमिनीतील बियाणे कीड खाऊ लागली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर परिसरातील शेतकºयांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.
अत्यल्प पावसामुळे दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:12 PM