शहरं
Join us  
Trending Stories
1
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
4
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
5
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
6
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
7
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
8
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
9
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
10
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
11
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
12
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
13
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
14
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
15
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
16
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
17
"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा
18
Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी
19
ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

ढोल, ताशांच्या निनादात पालखी मिरवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:47 PM

उत्साह :  टिपरी नृत्याने वेधले लक्ष; चौका-चौकात करण्यात आली पूजा

ठळक मुद्देउत्साह :  टिपरी नृत्याने वेधले लक्ष; चौका-चौकात करण्यात आली पूजा

धुळे : चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त श्री एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टतर्फे शुक्रवारी सायंकाळी आदिशक्ती एकवीरादेवीची पालखी मिरवणूक ढोल, ताशांच्या निनादात वातावरणात काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत सहभागी भाविकांनी  ‘एकवीरा माता की जय’ चा जयघोष केला. चौका-चौकात भाविकांनी पालखी पूजन केले. तसेच पारंपरिक नृत्याविष्कारही सादर केले. यावेळी महिला सदस्यांनी सादर केलेल्या टिपरी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  प्रारंभी आदिशक्ती एकवीरा देवी मंदिरात पालखीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. सकाळी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव व  कमल गुरव यांच्या हस्ते झाले. दुपारी माध्यान्ह आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर ट्रस्टच्या वतीने शिºयाचे वाटप करण्यात आले. आरतीला भाविकांची गर्दी शुक्रवारी, दुपारी १२ वाजता भगवतीच्या मंदिरात आरती झाली. या वेळी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. आरतीनंतर नवस फेडण्यासाठी सलग दुसºया दिवशी भाविकांची गर्दी दिसून आली. या मार्गावरून गेली मिरवणूक एकवीरादेवी मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक गल्ली क्रमांक चार, नेहरू चौक, पंचवटी टॉवर, मोठा पूल, नगरपट्टी, सहावी गल्लीमार्गे पुन्हा मोठ्या पुलावरून मंदिरापर्यंत काढण्यात आली.  

टॅग्स :Dhuleधुळे