लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बोंडअळीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रापैकी ९० टक्के म्हणजे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्याचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित पंचनामे येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान बोंडअळीमुळे शेतकºयांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कपाशीवर यंदा सुरुवातीपासूनच वेगवेगळी नैसर्गिक संकटे आली. बोंडअळीमुळे शेतकºयांचे पार नुकसान झाले. जिल्ह्यात गेल्यावर्षी ५२७ गावातील शेतकºयांनी २ लाख ५ हजार ३८३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली होती. त्यापैकी १ लाख ५३ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी बोंडअळीमुळे प्रभावित झाली. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे १० दिवसात पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार ११ डिसेंबर २०१७ पासून कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी पंचनामे सुरू केले. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत हे पंचनामे होऊ शकले नाहीत. दरम्यान १५ जानेवारी २०१८ पर्यंत ५०० गावातील १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्यांचे काम पूर्ण झालेले आहे.उर्वरित पंचनामे आठवड्यात पूर्ण होणारदरम्यान पंचनाम्याचे १० टक्के काम बाकी असून, ते याच आठवड्यात पूर्ण केले जाईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.सर्वाधिक बाधित क्षेत्र शिरपूर तालुक्यातबोंडअळीमुळे बाधित क्षेत्रापैकी सर्वाधिक नुकसान शिरपूर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात ५३ हजार ३९० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्याखालोखाल शिंदखेडा तालुका -४९ हजार ९०१ हेक्टर, धुळे तालुका -४५ हजार ३०१ हेक्टर तर साक्री तालुक्यात केवळ ५ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी बोंडअळीमुळे बाधीत झालेली आहे. कोट्यावधी रूपयांचे नुकसानबोंडअळीमुळे जिल्ह्यात कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना राष्टÑीय आपत्ती सहायता निधीतून भरीव मदत करण्यात यावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.
धुळे जिल्ह्यातील बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 5:58 PM
उर्वरित पंचनामे याच आठवड्यात पूर्ण होणार, कोट्यावधी रूपयांचे नुकसान
ठळक मुद्दे५२७ पैकी ५०मे ० गावांतील पंचनापूर्णकोट्यावधी रूपयांचे नुकसानसर्वाधिक नुकसान शिरपूर तालुक्यात