धुळे, दि. 25 : धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीकाठच्या पाणीटंचाई जाणवणा:या गावांसाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून बहुप्रतिक्षित पाण्याचे आवर्तन अखेर शनिवारी दुपारी सोडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या 85 गावांना दिलासा मिळाला आहे. प्रतिसेकंद 400 क्युसेक्स या वेगाने नदीपात्रात प्रतिदिन 35 द.ल.घ.फू. एवढा विसर्ग होणार आहे. मार्च महिन्यासाठी आरक्षित 200 द.ल.घ.फू. पाणी आवर्तनाद्वारे सोडण्यात येणार आहे. शनिवारी कार्यकारी अभियंता के.टी. सूर्यवंशी यांनी आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. दुपारी 12 वाजता जलसंपदा विभागाचे उपअभियंता एस.ओ. पवार, उपअभियंता बी.डी. जाधव, नागेश वट्टे, सहायक अभियंता जी.व्ही. जिरे यांनी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली. पाणी चोरी झाल्यास गुन्हे दाखल करणारपाण्याची चोरी होऊ नये, यासाठी महसूल व पाटबंधारे या दोन्ही विभागांची पथके यावर लक्ष ठेवणार आहे. या संदर्भात संबंधिताविरूद्ध गुन्हादेखील दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिका:यांनी दिले आहेत.
धुळे जिल्ह्यातील 85 टंचाईग्रस्त गावांना आवर्तनामुळे दिलासा
By admin | Published: March 25, 2017 4:51 PM