कापडणे, दि.26- धुळे तालुक्यातील कापडणे व देवभाणे शिवारात पाणी टंचाईमुळे डाळींब बागांना अपेक्षित असलेले पाणी देता येत नसल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. परिणामी, रणरणत्या उन्हात डाळींब बागा कोरडय़ा पडत असून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतात लागवड केलेल्या डाळींब बागा वाचविण्यासाठी येथील शेतकरी त्यांचा जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत.
कापडणे व देवभाणे शिवारातील शेतकरी मच्छिंद्र मधुकर माळी, अशोक जिजाबराव देसले, विठ्ठल शंकर देसले, रामकृष्ण मुरलीधर पाटील, संजय युवराज पाटील, उदय धनराज पाटील, सुशील माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रमेश माळी, अरूण पुंडलिक पाटील आदी शेतक:यांनी त्यांच्या शेतात डाळींबाची लागवड केली आहे.
प्रशासनाचे सहकार्य नसल्याने शेतक:यांना फटका
येथील डाळींब उत्पादक शेतकरी मच्छिंद्र माळी या शेतक:याने देवभाणे शिवारातील गट नं. 70/2 येथील बोअरवेलचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडील त्यांच्या गट क्रमांक 161 शेतातील विहिरीत पाईपलाईनद्वारे आणण्याचे नियोजन केले होते. परंतु, या कामामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला परवानगी नाकारली. त्यामुळे आता डाळींब बागा वाचविण्याचे आव्हान मच्छिंद्र माळी यांच्यासह इतर शेतक:यांसमोर उभे ठाकले आहे.
330 झाडे पाण्याअभावी करपली
कापडणे येथील देवभाणे शिवारात मच्छिंद्र माळी या शेतक:याने 1 हेक्टर जमिनीत डाळींबाची 630 डाळींबाच्या झाडांची लागवड केली होती. परंतु, त्या शेतक:याच्या शेतातील विहिरीतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून गेली आहेत. उर्वरीत 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून कोरडली पडल्यामुळे नाईलाजाने त्या शेतक:याला करपलेली डाळींबाचे झाडे उपटून फेकून द्यावे लागले आहे.