ऑनलाईन लोकमत
साक्री,दि.23- सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. मात्र या कामामुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मालणगाव धरणापासून निघणा:या पाण्याच्या पाटचा:या व कान नदीवरील अनेक गावांच्या शिवकालीन बंधा:यांच्या पाटचा:यांमध्ये मातीचे ढिग व महामार्गावरील तोडण्यात आलेले वृक्ष फेकून दिल्यामुळे पाटचा:या उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे भविष्यात तालुक्यातील बहुतांश शेतक:यांवर फडबागायतीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
साक्री तालुक्यात कान नदीवरील अनेक गावांना शिवकालीन बंधारे आहेत. त्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येते. परंतु, सध्या या फडबागायतीच्या पाटचा:यांलगत अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी, या पाटचा:या बुजल्या जात आहेत. यामुळे तालुक्यातील शेतक:यांना पाटचा:यामंधून मिळणारे पाणी हे भविष्यात मिळणे बंद होणार असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
लहान शेतक:यांसाठी फडबागायत सोयीची
कान नदीच्या उगमापासून अनेक गावांच्या बंधा:यांमुळे येथील फडबागायतीला एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे कान नदीकाठावरील 15 ते 20 गावांच्या शेतकरी, शेतमजुरांचा फायदा होतो. सर्वसाधारण शेतकरीही विहिर, विद्युत मोटर, विद्युत बिल, स्वतंत्र रखवलदार आदींचा खर्च न करता 10 गुंठय़ांपासून एक दोन एकर क्षेत्र अगदी अत्यल्प खर्चात बागायत करून दोन पिके सहज काढत असतात. ही फडबागायत जीवंत ठेवणे लहान शेतक:यांना परवाडणारी व काळाची गरज झाली आहे.
पाटचा:यांचे काम पर्ववत करा!
फडबागायत जिवंत ठेवण्यासाठी महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे तोडण्यात आलेल्या पाटचा:यांचे काम पूर्ववत व्हावे, अशी मागणी बाबूलाल पवार, बापूसाहेब भंडारी, नवल नांद्रे, जी. के. नांद्रे, किशोर पवार, संदीप पवार, भालचंद्र पवार, जितेंद्र भंडारी, दिनेश देसले, संजय सोनवणे आदी शेतक:यांनी केली आहे.